Marathi Quote in Story by Payal

Story quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

माझा धक्का लागुन तिची bag खाली पडली....
ती मी तिला उचलून दिली...
ती bag घेत thnx म्हणाली ......
तिला पाहतांच अंगावर एक गोड शिरशिरी आली....
अगं thnx कशाला उगीच आणि तिला smile दिली ...
ती पुढे जाऊन एका site ला उभी राहिली....
मी हि तिच्या शेजारी जाऊन उभा राहिलो ....
कसं बोलू तिच्याशी याचा विचार करू लागलो ....
शेवटी मनाशी ठरवून तिला विचारले ....
नाव काय ...?ती खाली बघत म्हणाली निशा....
मनात म्हणाले nice name निशा...
थोड्या वेळात दोघेही एकमेकांशी मनमोकळे बोलायला लागलो...
गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही ....
तीची train केव्हा आली समजलंच नाही....
बोलता बोलता मी पत्ता दिला , परत भेटू म्हणाली ....
ते ऐकून खूप भारी वाटलं....
मी हि तिला bye bye केले ....
तिने हि हसत मला bye केले ....
आणि मी घरी परतीच्या वाटेला निघालो ....
पण मनातून मी खुप खुप खुश होतो....
थोड्या दिवसातच मी तिला पत्र लिहावे म्हटले ....
माझ्या मनातले सगळे सांगावे ठरवले ...
कागद पेन घेताच मन तिच्या आठवणीत हरवले ....
मनामध्ये एक भारीवाली feeling आली...
थोड्या दिवसात तिचे पत्र आले ......
ते हातात घेताच मन प्रसन्न झाले....
पत्र वाचायला सुरवात केली...
पत्र वाचून डोळ्यात पाणी भरले ..
तिने तिच्या जीवनाची आजपर्यंतची कहानी लिहली होती ...
अशी गोष्ट जी मी कधी स्वप्नात हि विचार नव्हता केला ...
तिने लिहले होते तिच्या आयुष्यातील सत्य ....
तिचे लग्न झालाय तीन वर्षापूर्वी ...
काळजाचा ठोका चुकला लग्न शब्द वाचण्यापूर्वी ...
पुढे लिहले होते .................
तिचा नवरा आणि घरचे अपघातात गेले ....
आपण भेटण्यापूर्वी माझा भूतकाळ तुला माहित असावा असे वाटले....
माझी कथा ऐकून तू भेटण्याचा विचार बदलशील ...
माजी व्यथा ऐकून तु तुझी स्वप्ने तोडशील ..
म्हणून उशीर झाला पत्राला ....
वेळ लागला मनाला समजायला.....
आणि पत्र वाचून मी सुन्न झालो ...
एकाएकी मी खूप रडू लागलो....
पण..... मनात एक विचार विजेसारखा चमकला .
अन् मनाला नवा मार्ग सापडला........
ती मुलगी असून एवढे सहन करतेय ...
अन् आपण मुलगा असून आपल्या घरच्यांसाठी काहीच करत नाही....
जर आपल्याला तिला अन् आपल्या माणसाना सुखी ठेवायचे असेल तर ....
मोठे झाले पाहिजे,नाव कमवले पाहिजे........
तिला आपली करण्यासाठी खुप मेहनत केली पाहिजे.....
असे म्हणून आज मी एक जबाबदार मुलगा झालो.......
हि तिचीच कमाल होती.............
मला दिशा दिली तिने.......
एखाद्या परीने जादूची कांडी फिरवावे ......
अन् आयुष्य बदलून जावे अगदी तसेच झाले ..
अन् तिला भेटण्याचा निर्णय मी घेतला..........
माझा निरोप मी तिला पाठविला....
ती येणार ही मनाला आशा होती .......
तिच्या हि मनात मी काय बोलेल याची भीती होती.........
अन् तो दिवस आला............
आज आमचे लग्न झाले......
अन् आज लग्नाची पहिली रात्र आहे....
आयुष्याच्या या वळणावर येऊन आम्ही थांबलो.......
एकमेकांना एकटक बघत उभे राहिलो..........
तिने घट्ट येऊन मिठी मारली........
आणि ती train मधली परी माझी झाली..........
कायमची.............
फक्त अन् फक्त माझी....😊

Marathi Story by Payal : 111902631
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now