आता तुझे फोटो मी पुन्हा नाही बघत . ते जुने दिवस आता तसेच नाही जगत . तू आठवण म्हणुन आहेस नेहमी सोबत ; पण तुझी आठवण म्हणुन " आठवण " नाही करत . दुरावलो आपण तरी हरवले नाहीत आपले रस्ते ; पण रोजच्या आपल्या वाटा आता मी नाही चालत . हा मान्य मी बोललो नाही कधी ; पण आता तू नाही तर कुणाशी बोलावं ? हे ही नाही कळत . उतरणीला झोकुन देतो , जखमां सोबत रीता होतो , आता कशाचीच परवा नाही करत . भेटले रस्ते चालत फिरतो ; मागे नाही वळत . हुंदका येतो , श्वास कोंडतो ; घुसमट होते , राहतो डोळ्यांना पाणी पाजत ; तूच सांग खरच का रे ? कुणाचं मरण खरचं कुणी नाही मरत ?