कधी असे व्हावे ,
समुद्र किनारा असावा , पौर्णिमेचा चंद्र असावा ,
आणि तू सोबत असावा.
कधी असे व्हावे ,
आभाळ भरून यावे , विजां सहित ढग बरसावे,
आणि हृदयातील धडधड तू ऐकावी .
कधी असे व्हावे
शांत गार वारा असावा ,
शेकोटीची ऊब असावी ,
आणि मी तुझ्या कुशीत असावे...