तुझ्या प्रेमात पडताना,
स्वतः चे भान विसरताना..
तुझ्या रंगात रंगताना,
स्वतः चे रंग पुसताना..
तुझ्या श्वासात भिनताना,
स्वतः चे श्वास विरताना..
तुझ्या डोळ्यात हरवताना,
स्वतः ची द्रुष्टी मिटवताना..
तुझ्या मायाजालात अडकताना,
स्वतः चे स्वत्व हरवून बसताना..
कसे कळाले नाही या वेड्या मना,
स्वतः चे जीवन अनोळखी च्या हवाली करताना..
-Its_anu_lekha