तार्यांनी भरलेले आकाश,
बाजूला समुद्र किनारा,
पण अपुर्ण आहे तुझ्याशिवाय
हा सुंदर नजारा...
चंद्र तारकांच्या शुभ्र चांदण्यांत
ऋतूकिरणांच्या प्रेमाची सुमनें फुलली,
गंध मिळाला शब्दांना प्रीतीचा
दोन प्रेमहृदयी प्रीत जूळली....
निळ्या नभी स्वप्ने अवतरली
अथांग सागरात प्रतिबिंब उमटले...
सुंदर ती स्वप्ननगरी नयनी साचली
पण तुझ्याशिवाय सारे नीरस भासले....
आकाशाला आस आपल्या प्रीतीची
समुद्राला तहान प्रेमळ शब्दांची
सारेच अधूरे वाटते सख्या रे
तू सोबत नसताना अपुर्ण वाट प्रीतीची....
प्रत्येकवेळी तूच सोबत असावा
आनंदाचे क्षण अपुले वेचावे सारे,
प्रत्येक भावना जपू एकमेकांच्या
सुखदुःखाच्या झोळीतील सारे...
आयुष्यातले सारे सुंदर नजारे
अपुर्णच भासतात तुझ्याविना,
तुझ्या प्रितीचा रंग नाही हृदयी
तर हृदयी गुलाबी रंग सुनासुना....