हिरकणी💫
मा. सिंधुताई सपकाळ होती सर्वांचीच माय,
गोर गरीब अनाथ दुर्बल मजूर श्रमिकांची होती ती दुधाची साय,
स्वतःच्या लेकीला ममतेला डोळ्याच्या अश्रूत दडवले,
कारण हजारो मुलामुलींची माय बनून त्यांना स्वावलंबी घडवले,
शिक्षण देऊन स्वयंरोजगार मिळवून त्यांना प्रगतिशील व कार्यक्षम बनवले,
योग्यवेळी त्याच क्षमतेचा जोडीदार देऊन त्याचे विवाह कार्य ही जूळवले,
कधी यशोदा कधी सरस्वती
कधी लेखिका कधी कवयत्री
कधी दुर्गा तर कधी साक्षात् झाशी ची राणी बनली
आलेल्या तुटपुंज्या मिळकतीतून आश्रम वसती गृहे, संस्था, शाळा उभारल्या
आजही त्या शाळेत आश्रमात अनेक मुलं मुली मोठी होऊन त्यांच्या कार्याचा झेंडा उभारला,
माणसांबरोबरच प्राण्यांनाही संरक्षण देऊन गोमाता बनली,
अनेक बक्षिसांनी पुरस्कारांनी
गौरवीले या शूर विरांगणीला
असा हा धगधगत्या कार्याचा दिवा अचानक विझला,
पण त्यांनी लावलेल्या वटवृक्षाचा
विस्तार असाच वाढत राहणार,
या महान कर्तृत्वदायीनी लक्ष्मीला
आमचा मानाचा मुजरा
या जगविख्यात हिरकणीला
हृदयापासून भावपूर्ण श्रद्धांजली💐