विद्यापीठीय पदव्या, गुणवत्ता ,बुद्धिमत्ता(IQ) यासोबतच यशप्राप्तीसाठी गरज आहे ती भावनिक बुद्धिमत्तेची.
"Emotional intelligence as the ability to sense , understand and effectively apply the power and acumen of emotions as a source of human energy, information and influence." Robert Copper and Arman Sawafs.
योग्य ती स्व जाणीव ,चिंता ,तणाव यांचे व्यवस्थपन, अंतर्मनातील संघर्ष आणि समूहांतर्गत संघर्ष यावर मात करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेची गरज असते. याचा पाया बाल्यावस्थेत , विद्यार्थीदशेत घातला गेला पाहिजे .जेणेकरुन अपयशाने होणारे खच्चीकरण ,नशा, अपराधिक मानसिकता,आत्महत्या, पलायन आदि गंभीर समस्या भविष्यात उद्भवणार नाहीत. किशोरवय हा तर शारीरिक, मानसिक अवस्थाबदलाचा काळ .त्यावेळी भावनिक तटस्थता नसेल तर याचे परिणाम जीवनावर दूरगामी होतात .कुटुंब ,समाजाव्यतिरक्त बालपणी सहाध्यायी व पुढें सहकारी, उच्च अधिकाऱ्यांशी समायोजन adjustment करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता हवीच .
म्हणून मुलांना आपल्या क्षमतांची ,मर्यादांची ओळख ,जाणीव करून उचित वर्तनासाठी प्रबलन reinforcement आणि चुकांचा परित्याग करण्यास शिकवावे. सुंदर स्वप्ने बाळगण्यात काही गैर नाही पण आपल्या आवाक्यातील ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करावा . अभिव्यक्ती सादरीकरण मुळे सभाधारिष्टय निर्माण होऊन संकोच ,भीती,लज्जा दूर होईल .
जीवनाप्रति ,समाजाप्रती सकारात्मक दृष्टी ठेवावी. प्रगतीच्या अनेक संधी तंत्रयुगात उपलब्ध आहेत म्हणून खचू नये. बदल हा संरचनेचा स्थायी घटक आहे तो स्वीकारण्याची सज्जता ठेवावी . क्षोभ, उद्रेक , अवसाद नियंत्रित करण्याचे ध्यान, साधना हे पारंपरिक व समुपदेशन counselling , मानसोपचार हे वैद्यकीय उपाय घेण्यास संकोचू नये .
अन्यथा ध्येय साध्यक्षमता, जिद्द असून तंत्रयुगात उपलब्ध आधुनिक साधने असूनही; अंतर्मनातील संघर्ष आणि ध्येय अनुकूल व्यक्तींच्या अभावामुळे समीपस्थ लक्ष्य स्वप्न होऊन राहील . उत्तम बुध्यांक IQ लाभून ही emotional fool चा ठप्पा लागून यश हुलकावणी देत राहील
पूर्णा गंधर्व