एकांतात बसुन बसुन
येते आठवण मला तुझी
मने जुळून ही जुळली
नाही प्रीत तुझी माझी
अजूनही मला आठवतात
तुझ्यासोबतचे क्षण ते आनंदी
तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची
मी कधीच सोडली नव्हती संधी
अजूनही होत असतो सारखा
सारखा भास मला तुझा
विचार येतो मनात माझ्या
तू विचार केला नव्हता का माझा .
एकदाही फिरून तू मागे
वळून बघितले नाही
अजूनही वाट मी सोडली नाही
मिळेल आशेचे किरण काही.
येशील का तू परतून पुन्हा
वाट मी पाहतोय तुझी
जुळवून आणशील का तू
प्रीत ही तुझी न माझी
-Harsh Yadav