Live in or leave it
स्वतः च अस्तित्व ,करिअर /भवितव्य निर्माण करण्यासाठी small town सोडून शहरांकडे येण्याची ओढ तशी जुनीच.पण जुन्या काळी मात्र थोडंसं बस्तान बसल्यावर ‘कुटुंब’किंवा ‘ मंडळी’ गावाकडून आणल्यावर सेटल झाल्याचा आणि जन्म सार्थकी लागल्याचा आनंद लाभायचा. त्यातही चाकरमान्याचा अर्धा जीव गावाकडच्या मातीत रुजलेला. भवितव्यापेक्षा पोटाचा प्रश्न मार्गी लागला हेच खरं कर्तृत्व वाटायचं. आता life style बदलली आहे.नैतिक मूल्यांपेक्षा पैशाचं मोल वाढले.
पदव्या आणि टॅलेंट यांना शहरातच काय तो न्याय मिळेल, शहरात आपला गॉड फादर वेटिंग आहे अशी धारणा घेऊन ,हे स्थलांतरित पक्षी स्वप्नांच्या मुक्त नभातुन ,शहरांतल्या छोट्या खोल्यांमध्ये adjust होऊ पाहतात. जागेचा,जेवणाचा ,जीवनाचा संघर्ष. स्वप्नाळूपणाला झगमगती दुनिया, मोठी पॅकेजेस यांची भूल पडते. स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी आलेल्यांची sharing सुरू होते. मेट्स अँड बडीज अशी नवीन नात्यांची श्रेणी येथे आल्यावर समजते. My life, my rules अशी झिंग चढते. यश/अपयशाच्या संघर्षात sharing means caring असा गैरसमज होतो. शारीरिक ,भावनिक ,आर्थिक असा गुंता होतो. Live in चं आकर्षण वाटते. जबाबदारी शिवाय होणारी सोय. मग आधुनिकता आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांचा मुलामा चढवून त्यांचं justification दिलं जातं. Relationship मध्ये एकमेकांना space देणारी ,views चा respect करणारी कपल्स नंतर कधी serious होतात किंवा एक पार्टनर emotionally involved होतो. सुरुवातीचा who cares!!! वाला attitude जाऊन आता अधिकार गाजविणे, काळजी ,म्हणूनच भांडणे सुरू होतात. विभक्त होण्याचा पर्याय तर स्वतः च दिलेला असतो. वैयक्तिक समस्या आणि व्यावसायिक /करिअर नुकसान यांचं बहुधा सख्य असावे. दोन्ही सोबत येतात. व्यसने, पार्टीज ,शो ऑफ यांना “चलता हैं ” बोलून दुर्लक्ष किंवा क्लास दिला जातो.
लंबी उडान भरण्यासाठी निघताना ,घरातल्याना आधीच छोटी सोच समजून दूर लोटलेलं असते. एकाच छता खाली असताना देखील आपल्याला समजून घेत नाहीत अशी तक्रार असतेच.आणि आता तर समोर one way असतो. लिव्ह इन मधले कुणी एक तो/ती just leave it…. म्हणून झटकून निघून जातो. एखादी better opportunity किंवा whatever..
मग सुरू होतं पतन. आमिष दाखवून फसविल्याचे आरोप- प्रत्यारोप ,नैराश्य आदी मानसिक आजार, व्यसनाधीनता, कधी आत्मघाताचा प्रयत्न.
प्रत्येक वेळी असंच घडेल ,असे नाही.येथे कोणत्याही नात्याचे समर्थन अथवा विखंडन करण्याचा माझा उद्देश नाही. आपले नातं कसे आणि कुणाशी ,कोणत्या प्रकारचे असावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. फक्त एकट्या पडलेल्या, broken relationship face करणाऱ्या कुणालाही घरचे, परिजनांनी स्नेह ,सहाय्य केल्यास त्या फेज मधून ते सहज बाहेर येऊ शकतील.तोंड फिरवल्याने ,कर्माची फळं भोगायला लावल्याने आपण त्याना गमावून बसू .व्यसनमुक्ती केंद्र, मानसोपचार यांची उपलब्धता करून द्यावी. आपले प्रियजन दूर असले तरीही संपर्काचा आणि मायेचा धागा तुटू देऊ नये. त्यांचा हितोपदेश हेच प्राथमिक समुपदेशन होय.
पैसा, प्रसिद्धी आणि पॅकेजच्या मागे धावताना बेगडी जीवनाची भुरळ पडू न देता, स्वतः चे आणि समाजाचे स्वास्थ्य टिकविणे ही आवश्यक आहे. जर यश प्राप्ती नंतर अपराधबोध ,क्षतीचे भय(नुकसान) आणि असुरक्षितता वाटत असेल तर तो पराभवच समजावा. आपले वर्तमानातील निर्णय, चयन उज्ज्वल भविष्याला आकार देतात. योग्य वेळी नकार, अपयशाचा स्विकार, चुकीचा सुधार आणि माघार हे निकोप जीवनासाठी आवश्यक असते. संपत्ती, प्रसिद्धी ,अधिकार, सत्ता हे यशस्वीपणाचे बाह्यस्वरूप मात्र आहे.खरं सौख्य प्रियजनांच्या सोबतीत आणि आत्मसंतोषात आहे.
#पूर्णा गंधर्व ©