आरसा म्हणतो असे, बघते कुणाला?
हाय.. तू श्रूंगार हा.. करते कशाला?
ओठ हे ओठांवरी तू.... ठेव ओले
गोडवा चाखायला साखर कशाला?
गुंतल्या केसांत गजरा मोगर्याचा...
गंध चढतो रेशमी माझ्या मनाला
वाचता आलेच ..तर वाचेल डोळे
भावणा वेचायला कागद कशाला?
थेंब पडतो पावसाचा.. खोल जातो
वेचतो ओलावल्या त्या मी मनाला...
पाहतो आहे तुला ...ओल्या शहार्या
तोल सांभाळू किती आणी कशाला?
स्पर्श होतो लाघवी .. येतास जवळी...
शब्द आहे तोकडे ...सांगू कुणाला ?
-शब्दांकूर