-------------------
शिर्षक - एक भेट
-------------------
ज्याच्या साठी जागतेय
त्याला एकदा जाग यावी
मरण्याआधी माझ्या एकदा
त्याची माझी भेट व्हावी
कित्येक रात्री ओलांडून
डोळे थकलेत जणू माझे
कसे पेलणार या वयात
जगण्यावर मरणाचे ओझे
कित्येकदा कहाण्या त्या
रोज पुन्हा पुन्हा वाचाव्यात
आपल्या एका भेटीसाठी
कित्येक पिढ्या घालाव्यात
---------------------
✍️सोनल सुनंदा श्रीधर
---------------------