###Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
# *।।संवाद।।*
-----------------------------
*आम्ही देवळात का जावं?*
*उत्तर:-* देवळात जाणं हे कंप्लसरी नाही. एखाद्याला आवडत असेल तर त्याची चेष्टा किंवा बुद्धिभेद करू नये.पूर्वी देऊळ ही संस्था विविध उपासनांचं तसंच धर्मशिक्षणाचं, अध्यात्मप्रचारचं स्थान या उद्देशाने विकसित झाली.आज त्याचं स्वरूप या उद्दिष्टांना पूर्ण करणारं असं प्रत्येक ठिकाणी दिसत नसेल,तरी देवळाचं महत्त्व आहेच. ते कळण्यासाठी खेड्यात जन्मायला,वाढायला आणि राहायला हवं. तिथे देवळाचा केवढा तरी आधार असतो आणि धाकही! तिथे प्रदर्शन नसतं. ऐहिक गरिबी असली तरी भावनेची श्रीमंती असते.
निवांत वेळेला देवळात जाऊन बसून पाहा, देवाच्या पुढे डोकं टेकून बघा,त्याच्या स्मरणात शांतपणे प्रदक्षिणा घाला,तीर्थ घ्या.तिथलं तेल,अंगारा कपाळाच्या मध्याला लावा.एका बाजूला एकटे थोडा वेळ डोळे मिटून मनातल्या मनात नाम-मंत्र म्हणत बसा. हे सगळं एकदा करून बघायला तुम्हाला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही.निघताना ' देवा, येतो बरं का!' असं मनात म्हणून नमस्कार करून निघा.नंतर तुमचं तुम्ही ठरवा परत जावं का नाही ते, पण हे सगळं अगदी एकट्याने आणि शांतपणे करून पाहा आणि मग देऊळ म्हणजे काय ते तुम्हला कळेल.
लक्षात ठेवा ,देवाचा किंवा कोणाचाच तुम्ही देवळात जावं असा अग्रह नाही, अगदी आपल्या धर्माचादेखील नाही. ज्यांनी या सर्व उपासना किंवा उपासना केंद्रे निर्माण केली त्यांनी ती आंतरिक स्फुरणातूनच केली. ते कमी बुद्धिमान,वेळ घालवणारे लोक नव्हते.देवळात जाणं कंप्लसरी नसलं तरी कमीपणाचं नसतं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे.आम्ही क्लबमध्ये का जावं?हा जसा त्याच्या वाईट परिणामांचा विचार करण्याचा प्रश्न आहे ,तसा आम्ही देवळात का जावं हा प्रश्न नाही.थोडा वेळ विचार बाजूला ठेवून ,ईश्वरचरणी डोकं टेकून विश्रांतीचा अनुभव घेण्याचा हा विषय आहे,ते तिथेच जाऊन केलं पाहिजे असं नाही.पण करता येतं एवढं लक्षात ठेवू.
*देवानी आपल्याला कही तरी दिले पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये तर देवानी आपल्याला बरच कही दिलय म्हणून मंदीरात जावे*
*!! रामकृष्ण हरी !!*
? ? ?