अभंग वाणी तुकारामाची.
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*!! पंढरीची वारी !!*
---------------------------
*पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे ॥1॥
बोले करुणा वचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥2॥
जाणे कळवळा । भावसिद्धींचा जिव्हाळा ॥3॥
तुका म्हणे नाम । मागें मागें धांवे प्रेम॥4॥*
भक्ताने पाचारण केले ( धावा केल्याने ) हरी धावून येतो , कारण तो भक्तीचा भुकेला आहे. करुणापूर्ण मनाने जो देवाला आळवितो, त्याच्यावर देव कृपा करतो, त्याला स्तनपान करतो. भक्तांच्या मनाची तळमळ आणि अंतःकरणातील भाव यांचा सोहळा तो जाणतो. तुकोबा म्हणतात, हरीचे नाम घेतले की, त्यामागोमाग त्याचे प्रेम धावत येते .
*.....चला_तर_मग.....*
*वारीत सहभागी होवुन संतानाच शरण जाऊया*
*येताय_ना_मग_वारीला पांडुरंगाच्या भेटीला..*
*!! जय जय रामकृष्णहरी !!*??????
?