Marathi Quote in Story by Suresh Bhalerao

Story quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

*ही कविता नसून औषध आहे:*
*डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी*

माणूस काय करतो ?

कुढतो जास्त ,
अन रडतो कमी !
म्हणून त्याचं हृदय ,
धडधडत असतं नेहमी !

बोलणं कमी झाल्यामुळे ,
प्रश्न निर्माण झालेत !
सारं काही असूनही ,
एकलकोंडे झालेत !

भावनांचा कोंडमारा ,
होऊ देऊ नका !
हसणं आणि रडणं ,
दाबून ठेऊ नका !

आपल्या माणसांजवळ ,
व्यक्त झालं पाहिजे !
खरं खरं दुःख सांगून ,
मोकळं रडलं पाहिजे !

हसण्याने , रडण्याने ,
दबाव होतो कमी !
भावनांचा निचरा ,
ही Fresh होण्याची हमी !

कुणाशी तरी बोला म्हणजे ,
हलकं हलकं वाटेल !
दुःख जरी असलं तरी ,
मस्त जगावं वाटेल !

येऊद्याना कंठ दाटून ,
काय फरक पडतो ?
*आपल्या माणसाजवळच*,
गळ्यात पडून रडतो !

*आपली माणसं* , *आपली माणसं* ,
बाजारात मिळत नसतात !
नाती-गोती जपून ती ,
निर्माण करावी लागतात !

भौतिक साधनं जमवू नका ,
*आपली माणसं* जमवा !
नाहीतर तुम्ही गरीब आहात ,
कितीही संपत्ती कमवा !

हाय , हॅलो चे मित्र बाबा ,
काही कामाचे नसतात !
तुझी पाठ वळली की ,
कुत्सितपणे हसतात !

हसण्यासाठी , रडण्यासाठी ,
माणसं जपून ठेव !
नाहीतर मग घरात एखादा
" रोबोट " तरी आणून ठेव !

रोबोटच्याच गळ्यात पडून ,
हसत जा , रडत जा !
शांत झोप येण्यासाठी ,
दररोज गोळ्या घेत जा !

दुःख उरात दाबून वेड्या ,
झोप येत नसते !
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते ,

इथून पुढे भिशी कर ,
हसण्याची अन रडण्याची !
हीच खरी *औषधं* आहेत ,
*डिप्रेशनच्या* बाहेर पडण्याची !!

......वरील कवितेचे कवी माहीत नाही .....

जगणे म्हटले तर खूप अवघड
म्हटले तर सोपे आणि सहज
छोटे छोटे प्रसंग सांगतात सत्य - असत्य
म्हटले तर शिकवण नाहीतर नुसतीच वण वण

कोणीतरी लिहिली
अन मला पाठवली
मला भावली आणि त्याहून जास्त पटली........ ?????

☘?☘?☘?☘

Marathi Story by Suresh Bhalerao : 111099788
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now