मुक्या वेदनांचे वेटोळे
चार भिंतीच्या आत असो की,
सताड मोकळ्या सडकेने
सुरक्षिता कुठे नामशेष झाली
गल्ली चौंकाच्या
रस्त्याने ॥
झपाटलेल्या सडकांवरून
भटकत रहावे अनंत यातना;
सहन करत तिने,उद्रेक होतो
अतिमानुषतेचा, किती कळस गाठला
निच्चतेचा अन् क्रुरतेचा ह्या नरभक्षकांने ॥
थोडसं गंभीर व्हायचं,
वर्तमानपत्रातल्या हेडलाईनंने चारचौघात
दुख: व्यक्त करायचं ,परत जैसे थे
सारं काही कॉमन झालं मँन
रोज एक तासात घडणारे चार बलात्कार ही ॥
रखरखत्या छातीवर बरबटले
असेन मुसंडी मारून तिला लिंगपिसाटानी तर ,
तिने मात्र न्यायव्यस्थेला धक्काही देऊ नये.
आंधळेपणाची पट्टी बांधली आहे
न्यायदेवतेने ॥
सरतेशेवटी सरतं सगळं,
संपतो श्वास तिच्यातला....
तरीही पेटत नाही ठिणगी कुणाच्या दिमाखात,
तो मातीमोल देह सरणावर पेटत जातो ,
ग्वाही देत परत परत ह्याच सरणावर निष्पाप जीव
भरडला जाईल म्हणत राख होतो....॥
© कोमल प्रकाश मानकर
इमेल Mankar123komal@gmail.com