#LoveYouMummy
प्रिय आई.. (miss you ?)
भेटला देव तर सांग त्याला,
बाळ तुझ वन-वन फिरतोय,
पुढच्या जन्मी तूच हवी,
म्हणून देवा प्रार्थना करतोय.
अश्रुंची मी शाई करुन,
कागदावर नुसती कल्पणा करतोय,
आज हातात पेन धरुण आई तुला पत्र लिहतोय.
काय लिहू आई ? कोणत्या पत्यावर पत्र हे पाठवू ? काही समजत नाही, आज वयाची तिशी गाठली मी, तरीही अश्रु सावरत नाही तुझी आठवण आल्यावर. नेहमी तुझा फोटो डोळ्यासमोर घेऊन असतो, कारण तूला प्रत्यक्षात पाहण्याची तू कधी संधीच दिली नाहीस मला. मी या जगात आलो आणि तू गेली, काय योगायोग समजावा त्या विध्यात्याचा. का खरंच एवढा तो तळमळत होता तुझ्या मातृ प्रेमासाठी? म्हणून तुला घेऊन गेला. आणि मला वंचित केलं तुझ्या मायेपासून. आई मी तुला नाही पाहू शकत, पण तू तरी बघतेसना मला, बघ माझी काय दुर्दशा झाली आहे. क्षणभर का होईना आई तू एकदा ये आणि मला कुशीत घे मी हसत हसत जगेन ग.
नऊ महिने सांभाळून तू जग मला दाखवलेस,
शून्यातून घडलोय मी, माझे विश्व तू बनवलेस,
हरवलोय मी या जगात ,
आधार फक्त तुझाच शोधतोय,
लवकर ये तू मला भेटायला,
हा लेक तुझी वाट बघतोय.
मिस यु आई .. .
या पत्रातील कवितांच्या ओळी ह्या माझ्या स्व:लिखित कवितेतील आहेत.