Quotes by Pravin Gavankar in Bitesapp read free

Pravin Gavankar

Pravin Gavankar

@pravin.gavankar
(49)

विरह.... माझ्या आवडत्या कवितेमधील एक कविता..

#LoveYouMummy

प्रिय आई.. (miss you ?)

भेटला देव तर सांग त्याला,
बाळ तुझ वन-वन फिरतोय,
पुढच्या जन्मी तूच हवी,
म्हणून देवा प्रार्थना करतोय.
अश्रुंची मी शाई करुन,
कागदावर नुसती कल्पणा करतोय,
आज हातात पेन धरुण आई तुला पत्र लिहतोय.


काय लिहू आई ? कोणत्या पत्यावर पत्र हे पाठवू ? काही समजत नाही, आज वयाची तिशी गाठली मी, तरीही अश्रु सावरत नाही तुझी आठवण आल्यावर. नेहमी तुझा फोटो डोळ्यासमोर घेऊन असतो, कारण तूला प्रत्यक्षात पाहण्याची तू कधी संधीच दिली नाहीस मला. मी या जगात आलो आणि तू गेली, काय योगायोग समजावा त्या विध्यात्याचा. का खरंच एवढा तो तळमळत होता तुझ्या मातृ प्रेमासाठी? म्हणून तुला घेऊन गेला. आणि मला वंचित केलं तुझ्या मायेपासून. आई मी तुला नाही पाहू शकत, पण तू तरी बघतेसना मला, बघ माझी काय दुर्दशा झाली आहे. क्षणभर का होईना आई तू एकदा ये आणि मला कुशीत घे मी हसत हसत जगेन ग.

नऊ महिने सांभाळून तू जग मला दाखवलेस,
शून्यातून घडलोय मी, माझे विश्व तू बनवलेस,
हरवलोय मी या जगात ,
आधार फक्त तुझाच शोधतोय,
लवकर ये तू मला भेटायला,
हा लेक तुझी वाट बघतोय.

मिस यु आई .. .


या पत्रातील कवितांच्या ओळी ह्या माझ्या स्व:लिखित कवितेतील आहेत.

Read More

कर्मबंध

awsome
https://www.matrubharti.com/book/10354530/

श्यामची आई - प्रारंभ

shyamchi aai hi kadamabri mhanje ek anmol bhet vachakansathi

एक असे वादळ

माझी पहिली भेट वाचकांसाठी
https://www.matrubharti.com/book/11998/

देवयानी (कथा )

पण स्टोरी कुठेतरी अर्धवट वाटते....

देवयानी आत्महत्या का करते हे जर वाचायला मिळाले तर स्टोरी अजून छान रंग घेईल
http://matrubharti.com/book/9497/

Read More

सत्य स्वीकारलं कि आयुष्य नक्की बदलत...

पण अजून थोडे पुस्तकात मुद्दे पाहिजे होते
http://matrubharti.com/book/2399/