मराठी विभाग
---------------
कविता वा री
घेऊनी मृदंग , भक्तांची रांग |
भजनात दंग , पंढरीच्या वाटावर….||
गळ्यात माळ , हातामधी टाळ |
उन पावसाचा खेळ,पंढरीच्या वाटावर…||
अवघड घाट , वळणाची वाट |
वारकरी दाट , पंढरीच्या वाटावर…||
रामकृष्ण हरी , मंत्र उच्चारी |
चालला वारकरी , पंढरीच्या वाटावर…||
आषाढी पर्वकाळ , झाला भक्तांचा मेळ |
निघाला पुर्णवेळ, पंढरीच्या वाटावर …||
अवघे जन जमले , कथा किर्तनी रमले |
भक्ती भावात रंगले , चंद्रभागेच्या घाटावर ||
आले पुण्य फळा , पाहिला