###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
??? *शुभ सकाळ* ???
आपल्या जीवनात आनंद आणि दुःख दोन्हीही अविभाज्य असतात.खरं तर ती अनेकदा बरोबरच येतात.जेव्हा आम्ही आनंदानं पाटावर जेवायला बसलेले असतो तेव्हा दुःख त्या पाटाखाली दडून बसलेलं असतं. आपल्या जीवनात तराजूच्या पारड्याप्रमाणं सुख - दुःख लोंबकळत राहतात . आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण व्हावेत म्हणून सर्वांची सतत धडपड चाललेली असते. जीवनात दुःखाशिवाय आनंदाची किंमत कळत नाही.जसे तापलेल्या लोखंडाला हातोड्याचे घाव सहन करावे लागतात मग त्याला हत्याराचा आकार लाभतो.यासाठी प्रथम आपण आपल्या अंतःकरणाचा गाभारा आनंदानं भरुन टाकावा आणि नंतर जगात आनंद उधळायला सुरूवात करावी. जीवनात हे सत्य लक्षात ठेवले तर आनंदाने जगता येईल!
??? *जय जय रामकृष्ण हरी* ???