उलटे ट्री (spiritual)
तुझे अस्तित्व एक मिस्ट्री,
त्यात बनवलीस हि कन्ट्री.
तुझ्या राज्यात रे नो एन्ट्री,
दिलेस आयुष्य कॉम्प्लिमेंट्री.
आम्ही जगतोय ऍक्सिडेंटली,
एकेक दिवस सप्लिमेंट्री.
तुझ्यासाठी डॉक्युमेंट्री.
आमच्या कर्मांची रे एन्ट्री,
हीच तुझी एलिमेंट्री.
आम्ही बनलो जरी जेन्ट्री,
त्रास देती तुझे सेंट्री.
तुझी हि अर्थ होईल जेव्हा विन्ट्री,
रीती होईल तुझी पॅन्ट्री,
तेव्हा दुसऱ्या पृथ्वीवरती,
लावशील ना आमचेच उलटे हे ट्री...????