Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#उपवास_स्पेशल

🌾वरई (भगर)चे उप्पीट

🌾 साहित्य
एक लहान वाटी वरई
दोन हिरव्या मिरच्या
एक बटाटा
दोन चमचे तूप
जीरे
अर्धा वाटी भाजलेल्या दाण्याचे कुट
एक मोठे आमसूल

🌾कृती
बटाटा घुवून त्याच्या फोडी करणे
तुपात या बटाट्याच्या फोडी प्रथम तळून घेणे
थोडा तपकिरी रंग आला की खाली काढून ठेवणे
(बटाट्याच्या फोडी कच्च्या घातल्या तरी चालतात )

🌾तुपात जिरे मिरची घालुन मिरचीचा रंग थोडा पालटला की
वरई चांगली मंद आचेवर भाजून घेणे

🌾यानंतर त्यात तीन ते साडे तीन वाट्या गरम पाणी घालणे
उकळी आली की अर्धी वाटी दाण्याचे कुट
एक मोठे आमसूल
चवी नुसार मीठ
(आवडत असल्यास एक चमचा साखर)
तळलेल्या बटाट्याच्या फोडी घालून
सारखे करून घेणे

🌾यातले पाणी आटत आले की गॅस बंद करून दहा मिनिटे झाकण ठेवून देणे
दणदणीत वाफ येते

🌾तयार उप्पीट वर कोथिंबीर व ओले खोबरे घालणे
वरई शिजताना भरपुर पाणी पिते
उप्पीट छान मऊ होते
उपासाला हा पोटभरू प्रकार आहे😊

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112039638
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now