Marathi Quote in Poem by Simran Ugavekar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

महाराष्ट्राचे खांन - पान


विश्वास नसेल तर करून घ्या खात्री;
रश्श्या बरोबर होऊन जाऊ दे एक
छानशी भाकरी.

गरमा-गरम उकडीचे मोदक खाऊन
तर पहा;
प्रेमात नाही पडलास तर मग पहा.

पाणीपुरीचे तिखट पाणी;
तू खाऊनच गाशील गाणी.

खुसखुशीत शंकरपाळ्या;
आवडली तर वाजवा टाळ्या.

कोल्हापूरची झणझणीत मिसळ;
ती खाऊनच तू कधी नाही विसर.

पुरणपोळी वर केवढं तूप;
तुला आवडेलच ती खूप.

मस्त तळलेली अळूवडी;
तू खाशीलच ती घडी-घडी.

पुलाव आहे मसालेदार;
आणि सोलकडी आहे थंडगार.

मुंबईचा मोठा वडापाव;
तू नक्कीच मारशील ताव...

एकदा महाराष्ट्रात येऊन तर बघ;
जातोस कसा ते बघते मी मग!

© Simran Ugavekar

Marathi Poem by Simran Ugavekar : 112028163
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now