Marathi Quote in Motivational by Balkrishna Rane

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

निर्माता ( अती लघु कथा)
नदीकिनारी असलेल्या त्या देवळात आज खूप गर्दी
होती.देऊळ छान सजवल होत. पताका बांधल्या होत्या.
मंद सुरात सनई वाजत होती. देऊळ आरश्यासारखे स्वच्छ केले होते.आज देवळात एका मोठ्या काथावाचकाचे कथा वाचन होते.पन्नास हजार रुपये त्यांची बिदागी होती.दूरवरून लोक त्यांचे प्रवचन ऐकायला आले होते.
मधल्या सभागृहात देवासमोर त्यांची बैठक होती.
" देव भेटण्यासाठी तप करावं लागत.आचरण शुद्ध पाहिजे.कडक नियम पाळावे लागतात."
कथा वाचक म्हणाले.
सगळ्यांनी मान हलवली.
तेवढ्यात बाजूच्या शेतात राबणारा एक शेतकरी
काम आटोपून घरी परतत होता. शेतात चिखल करून त्याने पेरणी केली होती.जाताना देवाला नमस्कार करण्यासाठी तो देवळात आला.आजुबाजूला न बघता
तो सरळ गाभा-यापर्यंत गेला. त्याच्या प्रत्येक पावलागणिक चिखलाचा एक ठसा तो उमटवत गेला.
त्याने क्षणभर देवाला हात जोडले.
कथा वाचक संतापले.
" वेडा कुठला...!सगळं देऊळ अपवित्र केलं.
हा पापाचा धनी होईल." ते ओरडले.
लोक त्या शेतकर्यांची मानगूट पकडून त्याला बाहेर नेऊन लागले.
तेवढ्यात लोकांचं लक्ष शेतक-याच्या पावलांच्या ठशांकडे गेले. त्या प्रत्येक चिखलाच्या ठश्यात एक हिरवगार
रसरशीत रोपट उगवलं होत. ते रोपट वा-यावर छान डोलत होते.सारे स्तब्ध झाले.
गाभा-यातून गंभीर आवाज आला...
" देव कर्मकांडाने नव्हे तर सहज भक्तीने भेटतो.
हा शेतकरी स्वतः लाखांचा पोशिंदा आहे तो स्वतः निर्माता आहे.तुम्ही देवालाच देवळाबाहेर हाकलता आहात."

बाळकृष्ण सखाराम राणे
860567802

Marathi Motivational by Balkrishna Rane : 112025823
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now