Quotes by Balkrishna Rane in Bitesapp read free

Balkrishna Rane

Balkrishna Rane Matrubharti Verified

@balkrishnarane64727gmail.com065213
(68.6k)

निर्माता ( अती लघु कथा)
नदीकिनारी असलेल्या त्या देवळात आज खूप गर्दी
होती.देऊळ छान सजवल होत. पताका बांधल्या होत्या.
मंद सुरात सनई वाजत होती. देऊळ आरश्यासारखे स्वच्छ केले होते.आज देवळात एका मोठ्या काथावाचकाचे कथा वाचन होते.पन्नास हजार रुपये त्यांची बिदागी होती.दूरवरून लोक त्यांचे प्रवचन ऐकायला आले होते.
मधल्या सभागृहात देवासमोर त्यांची बैठक होती.
" देव भेटण्यासाठी तप करावं लागत.आचरण शुद्ध पाहिजे.कडक नियम पाळावे लागतात."
कथा वाचक म्हणाले.
सगळ्यांनी मान हलवली.
तेवढ्यात बाजूच्या शेतात राबणारा एक शेतकरी
काम आटोपून घरी परतत होता. शेतात चिखल करून त्याने पेरणी केली होती.जाताना देवाला नमस्कार करण्यासाठी तो देवळात आला.आजुबाजूला न बघता
तो सरळ गाभा-यापर्यंत गेला. त्याच्या प्रत्येक पावलागणिक चिखलाचा एक ठसा तो उमटवत गेला.
त्याने क्षणभर देवाला हात जोडले.
कथा वाचक संतापले.
" वेडा कुठला...!सगळं देऊळ अपवित्र केलं.
हा पापाचा धनी होईल." ते ओरडले.
लोक त्या शेतकर्यांची मानगूट पकडून त्याला बाहेर नेऊन लागले.
तेवढ्यात लोकांचं लक्ष शेतक-याच्या पावलांच्या ठशांकडे गेले. त्या प्रत्येक चिखलाच्या ठश्यात एक हिरवगार
रसरशीत रोपट उगवलं होत. ते रोपट वा-यावर छान डोलत होते.सारे स्तब्ध झाले.
गाभा-यातून गंभीर आवाज आला...
" देव कर्मकांडाने नव्हे तर सहज भक्तीने भेटतो.
हा शेतकरी स्वतः लाखांचा पोशिंदा आहे तो स्वतः निर्माता आहे.तुम्ही देवालाच देवळाबाहेर हाकलता आहात."

बाळकृष्ण सखाराम राणे
860567802

Read More

त्रिकूटे ( हायकू) 3
१) शुभ्र प्रपात २) हलती झाडे
उसळे डोह सारा बरसती थेंब हे
न हा सोहळा नसे अंतर

३) सहज नको. ४). चपला नभी
नजरेत बाण घे. आसूड ओढे कुणी
मनी आण घे थरार उठे

५) शितल धारा ६) स्वप्नात तिच्या
झेलीत अंगावर हिरवा गाव येतो
धुंद नाचावे. मोर नाचतो

७) संततधार. ८). रंग नारिंगी
बरसत्या थेंबाची सजली मावळती
आसव तशी. उडे बगळा

९) घोडा रिंगणी १०) पोपटी पाती
सवे भजनी मेळा. डोलती कणस वरी
देखीली वारी. आली ग सुगी


बाळकृष्ण सखाराम राणे .
8605678026

Read More

आई
आज तू नाहिस
तरीही क्षणाक्षणाला कस
तुझे अस्तित्व जाणवत राहतं?

उन्हा - तान्हात भटकताना
तुझ्या पदराची सावली
सतत का असते डोईवर ?

ठेच लागून घडपडलो तर
' लागलं तर नाही ना बाळ'
असं कोण विचारत ग?

दुध भाताचा गोड घास
ढगाआडचा चांदोबा, नाचणारा मोर
चिऊ-काऊची गोष्ट आजही कोण सांगत ग?

देवाच्या घरी दूर तुझे गाव
तुझ्या मनाला नसेल तिथे ठाव
आजही असतात का ग
वाटेवर माझ्या डोळे तुझे?

( सगळ्या आईंना समर्पित)
दि.१०/०५/२६
बाळकृष्ण सखाराम राणे

Read More

शिवराज्याभिषेक
( जिजाबाई गवाक्षाजवळ उभ्या आहेत.हिरा नावाची महिला पालखी आल्याची वर्दी देते. त्यावेळच जिजाबाईंच मनोगत )
" काय म्हणालीस हिरा..!
राजांचा राज्याभिषेकचा मूहूर्त जवळ आलाय? पालखी दरवाज्याजवळ आलीय...!हो , हो मी तयार आहे.या गवाक्षातून मघापासून मी सारी हालचाल न्याहळतेय....ही वर्दळ..हा जल्लोष
मंत्रघोष...सनई- चौघड्यांचे आवाज... घोड्यांच्या टापा आणि हत्तींचे चित्कार...डोळे...कान आणि मन तृप्त झाले हिरा.
सार्या हिंदुस्थानतल्या आयांचे मन भरून आलंय ग. त्यांचा लाडका
शिवबा आज छत्रपती होतोय. अगं तो फक्त माझा मुलगा नाहीय..सगळ्या हिंदुस्थानतील स्रीयांचा मुलगा आहे...भयभीत झालेल्या भगीनींचा भाऊ आहे.
अगं..गेल्या तिनशे वर्षांपासून ही भूमी
या देशीचा कोणी राजा होईल या आशेने वाट बघत होती...आज ही मातृभूमी धन्य होईल
पण...पण हा प्रवास साधा सोपा नव्हता.पावला पावलावर साक्षात मृत्यू सावली सारखा मागून फिरत होता. असंख्य मावळ्यांनी त्यासाठी आपले प्राण अर्पण केलेयत. स्वराज्याच्या या हवनकुडांत हसत हसत उडी मारलीय .आज ते सगळे तृप्त होतील.
हिरा..हिरा तूला आठवतंय...? एका स्रीला पळवून तिच्यावर अत्याचार करणार्या उन्मत्त अश्या रांझ्यांच्या पाटलाला शिवबाने अवघ्या सोळाव्या वर्षी हात पाय कलम करण्याची शिक्षा दिली तेव्हाच अख्या मावळखोर्यातल्या माय माऊलींनी आपल्या पंचप्राणानी शिवबाच औक्षण केलं होतं.
तेव्हा आम्हाला धन्य वाटलं होतं .शिवबांना आम्ही रामायण महाभारतातील जे धडे दिले होते ते व्यर्थ जाणार नाहीत हे आमच्या लक्षात आलं होतं.
यवनांच्या घोड्यांच्या टापा खाली सारा महाराष्ट्र भरडला जात होता...लेकी बाळींची अब्रू वेशीवर टांगली जात होती....उभी पिके धडाधडा पेटत होती...देवळे आणि देवांवर तलवारी हातोडे पडत होते तेव्हा इथले सरदार ..वतनदार षंडासारखे मान खाली घालून त्यांची चाकरी करत होते. तेव्हा... शिवबा आणि त्याचे सवंगडी
स्वराज्याची शपत घेऊन ... प्राण तळहातावर घेऊन उभे ठाकले.
हिरा...अग , जेव्हा अफजलखान ' शिवबाला मुर्दा या जिंदा घोड्यावर घालून विजापूरला आणतो 'असा विडा उचलून महाराष्ट्रात आला तेव्हा सार्या महाराष्ट्रात हलकळ्ळोल उडाला होता. सारा महाराष्ट्र देव पाण्यात ठेवून बसला होता पण... पण माझा शिवबा डगमगला नाही.हाताने पोलादी पहार वाकवण्यार्या त्या सहा फूट उंच... अमानवीय अफजलखानाने बगलेत मान धरून हल्ला केला तेव्हा आई भवानीच नाव घेत शिवबाने वाघनखाने त्याचा कोथळा बाहेर काढला.तेव्हा अवघ्या महाराष्ट्रभर दिवाळी साजरी झाली होती. आणि तो..तो...क्रूर
सिध्दी जौहार पन्हाळगडला वेढा घालून बसला होता तेव्हा शिवा काशिद आणि बाजी प्रभूंनी आपले प्राण गमावून शिवबाला विशाळगडावर सुखरूप पोहचायला मदत केली होती.
हिरा...अगं तो औरंग्याच्या मामा...शाहिस्तेखान आपल्या लाल महालात तळ ठोकून ...मावळखोर्यात अत्याचार करत होता.तेव्हा शिवबा आणि मावळ्यांनी धाडस करून लाल महालात घुसून त्याची बोटे छाटली होती. जीव घेऊन तो महाराष्ट्रातून पळाला होता.अग असं धाडस जगात आजतागायत कोणी केलं नसेल.
काय म्हणतेस? मला श्वास लागतोय ..थोडं हळू बोला.
अगं हा क्षण पुन्हा येणार नाही. अवघा महाराष्ट्र माझ्या तोंडून बोलतोय. शिवबा आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेला तेव्हा काळजावर दगड ठेवून मी दिवस काढले.स्वत:च्या बापाला कैदेत ठेवून झिजवून मारणार्या ... भावांना कपटाने मारणाऱा ,औरंगझेब शिवबांला जीवंत ठेवणार होता का? पण शिवबाने त्याच्या हातावर अलगद तुरी दिली.... महाराष्ट्रात आला.सार्या हिंदुस्थानच्या जीवात जीव आला. शिवबा म्हणजे साक्षात रूद्र...! अन्याय...
अत्याचार...अधर्म...यांचा नायनाट करणारा रूद्र! आज या स्वराज्यात
धर्माचं ,नितीन, न्यायाच राज्य आहे. कुणा अबलेकडे डोळे वर करून बघण्याची आज कुणाची हिंमत होत नाही.आज देव अन् धर्म सुरक्षित आहे.हे श्रींच राज्य आहे... आणि ते चंद्रकलेप्रमाने वाढत जाईल. असंच शिवबा म्हणतो. येणार्या शेकडो पिढ्या स्वराज्यचा आदर्श डोळ्यापुढे ठेवतील.
हिरा चल...! हा सुवर्ण क्षण मला डोळ्यात साठवायचा आहे.शतकानंतर ही रम्य पहाट आज दिसलीय.अवघा हिंदुस्थान आणि सगळं जग हा सोहळा पाहण्यासाठी रायगडावर जमा झालंय.
माता म्हणून मी धन्य झाले.माता जगदंबा साक्षात या सोहळ्याला आली असेल नाही !
जगदंब...जगदंब ...
( नमस्कार करते.)

Read More

काही समजेना झालय

जगायची अडचण आहे
मरणाचीही बोंब आहे
जगायच कशासाठी , कुठवर
आणि कुणासाठी?...काही समजेना झालंय
नित्य चाले भजन, पूजन
गल्लोगल्ली किती उगवलेत
बाबा ,बुवा आणि साधु-संत
देव झाकावा अन् बुवा पुजावा....काही समजेना झालय
कोण राम कोण कृष्ण ?
इथे थोर राम - रहिम ,आसाराम
योगेश्वर अन् बाबा बागेश्वर
आजही वाळीत पडले ज्ञानेश्वर... काही समजेना झालंय.
शाहू - फुले -आंबेडकर वनवासात
मना- मनात विकृत बाबा खरात
कुणी पाय धुवी, कुणी आरती गाई
म्हणू कसा ?जयजय महाराष्ट्र माझा...काही समजेना झालय
लाज, भीड ,शरम ही भावंडं
कधीच लागली देशोधडीला
कोण खरा कोण कोण खोटा
सत्तेसाठीच ना हा साराआटापिटा? ... काही समजेना झालय

बाळकृष्ण सखाराम राणे

Read More

त्रिकूट २(हायकू )

१) सल घेऊन             २)  जळी मासोळी  
   भूईचाफा फुलला           बक ध्यान करी
    गंध उरला.                  कोकीळ गाई
 ३)  वणवा वनी              ४) कोण कुणाचा
     आर्त जीवांचे मनी             वारा विचारी मला
     हसल कुणी                      दिवा का जळे
          ५)  टिळा कपाळी                ६) फुलली बघ
               चाललो पंढरीसी           रातराणी अंगणी
                मी वारकरी                 भूल पडली
       ७) पाऊस अवेळी                 ८) मनास मोहे
            घाई कर सजनी                      साज शृंगार तूझा
            उडे पाकोळी                          वेड अनोखे
९) उगाच गाई                          १०) हले तुळस
    कुणी कुणाची व्यथा                     वाट पाही श्रीरंग
    मन मोगरा                               दिवा अखंड

बाळकृष्ण सखाराम राणे
8605678026​

Read More

काही  त्रिकूटे( हायकू)

१) पक्षी उडाले.                 ३)  थेंब पहिला
फांदी हळहळली.                  माती गंधीत झाली
फुले रुसली.                        मन हसले.

२) बासरी वाजे              ४)  हिरवे रान
  गोकुळ जागे झाले                बेधुंद होई वारा
 सांज सजली                          झेलीत गारा
                      ५)चंद्र खुणावे
                         चंद्रिका उगा लाजे
                          चकोर जागे
६) सावली माझी.                 ७)रात चांदणी
तरीही मी परका.                      रातराणी दिवानी
ऊन बेभान                           परी तू कुठे?

८)शिळ  हळवी.                ९) नसावं अस
   गोफ इंद्रघनुचा.                  त्रयस्थ व परक
   मी नसे माझा.                   आपलं मन
               १०) निळे आभाळ
                    अभ्रे शुभ्र ढगांची
                   सुने क्षितीज
बाळकृष्ण सखाराम राणे ​

Read More

बाबा
तुघडुक तुघडुक घोडोबा
त्यावर बसली लाडोबा
लाडोबाचे लाड करतय कोण?
समजल का?अं..अं...अं
माझे बाबा ! आणखी कोण..? ॥१॥
   
  गंमत आम्हा दोघांची
गुपचूप खाऊ खाण्याची
भातुकली असो वा लपाछपी
मिळून खेळतो खेळ किती
समजल का? मी.आणि ...आणि..
माझे बाबा ! आणखी  कोण..? ॥२॥

बाबा नसता घरी
करमेना मज क्षणभरी
कातरवेळी येता घरा
जवळ घेऊन म्हणे कसा
आवरून  बघ पसारा 'सारा '
तुझ्यासाठी धावत आलो कोकरा
खळखळून हसतो आम्ही दोघ
समजल का? मी अन् ..अन्
माझे बाबा ! आणखी कोण..? ॥३॥

मी रडता मज घट्ट धरी
डोळे पुसून म्हणे 'कातरवेळी '
रडू नको पोरी
तुझ्यासाठी झुरतो मी
तुझ्यात गुंतला जीव
होवून लहान गंमत करी छान
इंद्रधनू मग फुले गालावरी
समजल का?
मी अन्...अन्
माझ्या बाबांच्या? आणखी कोणाच्या.?॥४॥

गोष्टी अन अंगाई
  हातांची मऊ उशी.
   दिवस कसा संपून जाई......




बाळकृष्ण सखाराम राणे

Read More