कविता माझी
सहजच...
सहजच भेट होते आपली
आणि सहजच मैत्री ही होऊन जाते
प्रवास मैत्रीचा होता होता
सहजच जाणवते तू गुंतला आहेस माझ्यात
मग सहजच गुंतत जाते
मी ही हळू हळू तुझ्यात ..
पण नंतर एका वळणावर जाणवते
तुझी भावना शून्यता...
हसत हसत तू म्हणतोस
अग सहजच बोललो होतो तुझ्याशी प्रेमा विषयी .
तू खरेच समजलीस की काय वेडाबाई.
सगळ्या गोष्टी सहजच करायची तुझी कला
चटका लावून गेली माझ्या मनाला
अशीच सहजच नाती तू यापुढेही जोडत जाशील
आणि सहजच तोडत सुद्धा जाशील
पण तुझ्या लक्षात येतेय का..
असे करताना एक दिवस..
खरेच साऱ्या भावना स्वतःच निघून जातील
तुझ्या आयुष्यातून सहजच...