स्त्री तू दुर्गेचा अवतार 🚩🚩🙏
अगस्त्री तू दुर्गेचा अवतार करू शकतेस तू भल्याभल्यांना ठार.
उचलून तलवार कर त्यांचा संघार.
कमी समजू नकोस तू स्वतःला तू आहे जिजाऊ ची लेक आणि सावित्रीबाई ची लेक.
मुलांसाठी मायेची ममता तू तर दैत्यांसाठी दुर्गेचा अवतार तू.
ओळख शक्ती स्वतःची तू साक्षात जगदंबा तू .
शिक्षणातही विज्ञानातही सर्व क्षेत्रात पुढे तू.
ओळखली आहे शक्ती स्वतःतली तू तर आता मागे वळून बघू नकोस तू.
जगातला शक्तिशाली व्यक्तीही घेतो तुझ्या कुशीतून जन्म.
अगं तूच तर आहेस या संपूर्ण सृष्टीचा जन्म.
कर अन्यायाला ठार तू उचल त्रिशूल आणि संघार तू घाबरू नकोस तिन्ही लोकांवर कर जय जय कार तू.
या सृष्टीची अस्मिता तू ,भवानीचा वार तू साक्षात या सृष्टीची पालन हार तू, काय म्हणू तुला अग महाकाली तू ,की दुर्गा तू ,उत्तर एकच साक्षात जगदंबा तू .....
dedicated you all my ladies you are the power my dear 🚩🚩🚩💫💫💫🔥🔥🔥🔥🔥💯💯
स्वरचित कविता प्रेरणा देवेंद्र वाघ.