नशीब 💫💯🔥
आज प्रश्न पडला म्हटलं असं काय असतं नशीब ?
सर्वजण देतात दोष त्याला ते का हे नशीब.
आजच्या लोकांचे कसं झालं आहे माहिती आहे का.
की काहीही वाईट झालं तर म्हणतात हा नशीबाचा खेळ आहे का?.
लोक जरी म्हणत असली तरी मी म्हणणार नाही.
कारण त्या कोणत्याही गोष्टीला नशीब जबाबदार नाही.
पण मग याला आज जबाबदार कोण नशीब की कृत्य.
उत्तर मात्र एकच कृत्य.
नशीब फक्त निमित्त तुम्ही केलेले कर्तुत्व हेच एकमेव सत्य.
त्यामुळे कृत्य करत चांगले
घडेल आयुष्यात नेहमी चांगले
राहू नका नशिबाच्या भरोशावर
स्वप्न पूर्ण करा कर्तुत्वाचा बळावर.
नशिबावर कर्तुत्व ठरत नाही
कर्तुत्वावर नशीब ठरतं.
आणि या परिस्थितीला जबाबदार कोण?
याचा कर्तुत्व हे एकमेव उत्तर उरतं.
म्हणून नेहमी नशिबाला दोष देत बसू नका तर चांगले कर्म करा 💯💯🔥💫💫
स्वरचित कविता प्रेरणा देवेंद्र वाघ.