देव आहे का? 🚩🙏✨
आज बोलावसं वाटलं या विषयावर. देव आहे का हा प्रश्न पडला सगळ्यांच्या मनावर.
विज्ञान श्रेष्ठ की देव श्रेष्ठ कळत नाही.
पण देव म्हणजे काय हे आपण समजलं नाही.
विज्ञान सांगतं विश्व कसं निर्माण झालं, आणि अध्यात्म सांगतं की विश्व का निर्माण झालं.
यावरून देव आणि विज्ञान यातील वेगळेपण मला समजू लागलं.
अहो देव म्हणजे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात.
पण देवाची मूर्ती मात्र असते प्रत्येकाच्या घरात.
अहो देव म्हणजे दगडाची मूर्ती नाही, तर भावना, सत्यता, प्रत्येक व्यक्तीत दडलेला असतो देव.
अरे गोंधडू नकोस भावनांच्या भरात फक्त एकदा देवावर विश्वास ठेव.
देव तुला दिसणार नाही पण जाणव मात्र शकतो.
म्हणूनच तर संकटाच्या वेळी देवा आता तूच सांभाळ! असे आपण म्हणतो.
देव प्रत्येकात दडलेला असतो फक्त त्याला असतो.
आई-वडिलांसारखा तोही आपल्याला बोट धरून चालायला शिकवतो.
घरातली ती माऊली म्हणजे देव, कष्ट करणाऱ्या बापात आहे देव, या सृष्टीतील प्रत्येक प्राण्यात आहे देव.
संकटात तुला दिसणार नाही पण जाणवेल मात्र फक्त तू विश्वास ठेव.
देव म्हणजे न्याय देव म्हणजे सत्यता, देव म्हणजे भावना आणि देव म्हणजे प्रेम, हेच आहे देवाची संकल्पना.
देव म्हणजे फक्त दगडाची मूर्ती ही नका ठेऊ भावना.
देव आणि विज्ञान हे फक्त माध्यम आहे जगण्याचे. पण दोन्हीही श्रेष्ठ आहेत शिकवतात आपल्याला मूल्य आयुष्याचे .
त्यामुळे देव शोधू नका कुठे भेटेल देव तुम्हाला तुमच्याच मध्ये. मदत करा सत्य रहा भरभरून जगा आयुष्य. शेवटी देव व विज्ञानानेच घडवला आहे मनुष्य.
शेवटी एकच म्हणेल देव अनुभवा व विज्ञान जगा🚩💯💯👍🙏✨✨🥰
राम कृष्ण हरी 🚩🚩
स्वरचित कविता, प्रेरणा देवेंद्र वाघ