॥ वृद्धाश्रमाची भिंत ॥
बोट धरुनी चालणे शिकवले ,
त्या आई-बाबांच्या नशिबात ती भिंत होय . x २
घराचे आधार अन् आर्थिक खांदे होते जे ,
त्या आई-बाबांच्या नशिबात ती भिंत होय . x २
॥ धृ ॥
मातेच्या मायेला ते ग्रहण लागले ,
मुलाच्या लेखी जीवनाचे हेच सार झाले . x २
बापाच्या विश्वासालाही ग्रहण लागले ,
मुलाच्या लेखी जीवनाचे हेच सार झाले . x २
॥ १ ॥
या युगाची ती विकृत काया ,
खोटी आश्वासने देऊन लावती माया . x २
आई-बापाच्या नशिबी आता त्या भिंती ,
खोटी आश्वासने देऊन धाडी वृद्धाश्रमी काया . x २
॥ २ ॥
त्या दोघांचे मोल ते अनमोल ,
सृष्टी दाविली आज तयांनीच . x २
मोह दाखविले परि ऋण हे थोर ,
सृष्टी दाविली आज तयांनीच . x २
॥ ३ ॥
तू अपंग आलास की चांगला आलास ,
माया त्यांची तेवढीच असे . x २
मग तुझ्यावर आज कोणते हे ढग दाटले ?
की वृद्धाश्रमी ती काया असे . x २
॥ ४ ॥
ज्या खांद्यांवर तू खेळलास ,
आज खांदे ते वृद्धाश्रमी . x २
आस त्यांची वेडी की तू येशील ,
आज ती आशा ते वृद्धाश्रमी . x २
॥ ५ ॥
वृद्धाश्रमाच्या त्या चार कोपऱ्यात ,
ती नदी सदैव साचे . x २
आई-वडिलांचे मोती थकले आता ,
ती नदी सदैव साचे . x २
॥ ६ ॥
आयुष्य काय ते व्हावे असेही ,
जीवनभर कष्ट , मग त्या वृद्धाश्रमी भिंती . x २
शरम वाटली पाहिजे जराशी ,
जीवनभर कष्ट , मग त्या वृद्धाश्रमी भिंती . x २
॥ ७ ॥
शरम वाटते का तुला मुला ?
ज्यांनी जपले तुला क्षणोक्षणी . x २
शेवटी राक्षस वृत्ती तू दाखवून दिली ,
ज्यांनी जपले तुला क्षणोक्षणी . x २
॥ ८ ॥
वृद्धाश्रमी तयांसी धाडून आता ,
घर हे माझे पोरके जाहले . x २
हात विश्वासाचा अन् मायेचा हात मी हरविला ,
घर हे माझे पोरके जाहले . x २
॥ ९ ॥
आता आशीर्वाद द्यायला हात नाही ,
धन हे माझे विलुप्त झाले . x २
दोन देवांची मी विचारांनी हत्या केली ,
धन हे माझे विलुप्त झाले . x २
॥ १० ॥
हा शेवटचा श्वास स्वर्गाप्रत गुंतला ,
बघ जा शेवटचे त्या सावलीशी . x २
ज्यांनी जीवनभर तुला छत्रछायेत ठेविले ,
बघ जा शेवटचे त्या सावलीशी . x २
॥ ११ ॥
पहा आला हा निर्दयी मुलगा ,
श्राप द्या या मुलासी . x २
मुलाच्या नावाला कलंक हा ,
श्राप द्या या मुलासी . x २
॥ १२ ॥
© T s K