शुद्ध कोण?"
✍️ - एका व्यथित मनाची कवित
आज ही जातीनं का मोजता माणूसपण,
ईश्वराची कथा सांगने गुन्हा,आहे काय ?
खालच्या जातीचा आहे म्हणून अपमान केला,
असे वागताना मनातला देव का झोपला होता काय?
शेंटी कापून होते काय काहो शुद्धीकरण,
मातीत मिसळलं माणुसपणाचं धन,
ईश्वराचे पावन कथा ऐकूनही न जागे,
का एवढं खालच्या थराला गेलय तुमचं मन?
स्त्रीच्या असो व कोणी ही मूत्रानं शुद्ध होतो का जीव?
की शुद्ध माणुसकीतच असतो जीवंत जीव,
हा धर्म, ही श्रद्धा, की हे केवळ उच्चजातीचे उदात्तीकरण
धर्माच्या नावाखाली का केला जातो बहुजनांचा झळ .
कोणत्या ही जातीचे असो कथा सांगणारे हे गुन्हेगार नाहीत,
ते सत्य, स्वच्छ भक्ती, आहेत देवाचे भोळे भक्त
शुद्ध कोण, हे ठरवण्याचा अधिकार तथा कथित कोणाला नाही .
वसुदेव कुटुंबकम हा नारा विसरलं का भारत देश
कवी : शिवव्याख्याते सुहास पाटील