खरंतर लिहिण्यासारखा शब्द कमी पडतील एवढा मैत्रीचा भाव असतो, जीवनात सगळं काही अपूर्ण असतं त्यांच्या शिवाय कसलाही वाव नसतो,
मित्रपणाचा भाव हा समजून घ्यायचा असतो कोणाला देण्यासारखा म्हणून तो द्यायचा नसतो,
मैत्री ही कधी कधी वेळ आल्यावर समजते, पण मला बहुतेक माझी मैत्री ही वेळ निघून गेल्यावरच कळाली असं वाटते
मित्र-मैत्रिणी असतातच आपल्या मनातील भावना समजून घ्यायला आपली परकेपणाचा भाव नसतो
रक्ताच्या नात्यापलीकडेही मानायला
मित्रा वरच्या कविता अनेक वाचून झाल्या छान छान गाणी गुणगुणून झाल्या
पण मैत्री म्हटली की असतं ते फक्त निरागस हास्य एकमेकांची चढा ओढ तर कधी अंतरीची पडलेली अढी सोडण्यासाठी शब्द बोलले ते गोड
सर्व नाते फिके वाटते मैत्रीसमोर,
मैत्री मिळावी मला मात्र माझ्या जीवनाअखेर पर्यंत! !
अजूनही खूप काही सांगण्यासारखं आहे,
मैत्रीविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे !!
बोलता बोलता बोलूनही जात, मनातलं काही शब्दगृहीत धरावी!आपली अशी मैत्री नक्कीच नाही जी इतरांना कमकुवत वाटावी! !
शब्द आणि शब्दाने दुखवतील जर कधी मने, माफ करावी शब्द भाषा माझ्या निर्मळ अंतकरणाने!!
मैत्री दिनाच्या सगळ्यांना मित्रमय शुभेच्छा✍️✍️Archu!!!