पाऊस असतो आपल्या नात्यांसारखा!!
एक असतो आपल्या बाबांसारखा कडकडणार्या विजेसहित गारवा आणणारा!!
एक असतो आपल्या आईच्या मायेसारखा ,रिमझिम रिमझिम सरी बरसvणारा!!
एक असतो आपल्या ( बहिणी)ताई सारखा,
असेल काही महत्त्वाची कामे तर करून घेण्यासारखा!!
पाऊस असतो आपल्या भावासारखा पाहिजे तेव्हा पाठिंबा देण्यासारखा! !
एक असतो मेघर्जनी सारखा. मित्र मैत्रिणीच्या घोळक्यासारखा!!
पाऊस म्हणजे फक्त पाऊस नसतो, आपला सखा सोबती त्याच्यात दिसतो! !
आपल्या सभोवताली फिरणाऱ्या चक्रासारखा,
नैसर्गिक दिसणाऱ्या निसर्गासारखा! !
मायेचा ओलावा असतो जसा नात्याचा,
सुगंधी सुगंध असतो त्या पावसाचा! !
कडकडणाऱ्या विजेला आतून रीत होण्यासारखा,
आभाळ भरून आलेल्या आभाळासारखा! !!
पाऊस असतो कधी आकाशातल्या रूद्रासारखा, रौद्ररूप धारण करतो, शिवशंकराच्या त्रिनेत्रासारखा!!
थेंबा थेंबात अस्तित्व असतं ज्याचं, अथांग होतो तो जसा समुद्र सारखं!!
नद्या नाल्यांना एकत्र करून वाहतो ,तो खळखळणाऱ्या ओढ्यासारखा,
पाऊस असतो नवरा बायकोच्या नात्यासारखा!!
प्रेम असतं धरित्री आणि नभा सारख, मातृत्व ते आपल्या पुत्रासारखं! !!
पाऊस म्हणजे पाऊस असतो, सगळीकडे पडेल असा तो नसतो!!!
पाऊस म्हणजे पाऊस असतो तुमच्या आमच्याकडे सेम नसतो!!😁😁
पाऊस येतो तेव्हा घेऊन येतो सुख आणि समाधान, पावसामुळेच आहे धरित्री ला मानसन्मान! !!
✍🏽✍🏽Archu❣️❣️