Marathi Quote in Thought by janhavi rege

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

हल्लीच आमच्या शाळेच्या मित्रमैत्रिणींचं reunion झालं. लहानपणीच्या गमती जमती, dating, शिक्षक, क्रश, स्पर्धा, भांडण,कॅरियर,struggle, लग्न, नवरा बायकोचे प्रश्न, मुलांचे शिक्षण, त्यांचे करियर,त्यांचे क्रश, तब्येतीचे प्रश्न वैगरे वैगरे.. हुश्शहह... केवढा मोठ्ठा काळ गेला..अचानक लक्षात आलं... आता प्रत्येकाच्या बाह्य रूपात फरक होतोय..केशकलप, आणि औषधं हा सगळ्यांचा कायम स्वरूपी दोस्त, काहींना काही शारीरिक त्रास, आणि डोकयावर कुठले ना कुठले ओझे... असे असले तरीही सर्व काही समायोजित करून प्रत्येकांची भेटण्यासाठी उत्सुकता काही आगळीच होती.केवळ भेटणं हे एकच जीवनाचं उद्दिष्ट असल्यासारखं वाटलं. एकमेकांना जोडणारा तो मैत्रीचा ओलावा प्रत्येकाला जाणवत होता, प्रत्येक जण त्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे व्यक्त होत होता..
आणि दुसऱ्याला शांत पणे समजून घेत होता..
शारीरिक दृष्टीने जरी वय वाढलं असलं तरी मनाने खंबीर होण्याची जाणीव झालीय, दुसऱ्यालाआणि स्वतःलाही सावरण्याचा सराव झालाय...असेलही रजोनिवृत्ती...पण तिला आपली सखी बनवून आनंदाने जगण्याची आता पक्की सवय झालीय.. स्वतःबरोबर दुसऱ्यालाही समजण्या एवढी परिपक्वता निर्माण झालीय.. बायका म्हणून जरा अतिरिक्त काहीतरी हवंच ना!! मग तो हॉरमोनल असंतुलन असो नाहीतर मानसिक चिडचिड..त्यालाही घट्ट मिठी मारून आपलंस करण्याची हिंमत आलीय.. मैत्रिणींना च नाही तर आपल्या मित्रानाही जाणून घेता येऊ लागलंय ..
सापासारखी कात टाकून आम्ही सारे नव्या जोमाने आणि नव्या उत्सहाने एकमेकांना नावीन्यपूर्ण नजरेतून जाणून घेत होतो.. आमच्या मित्रानीही स्वतःच्या कुवतीप्रमाणे झेललाय आपला संसार.. केलीय तारेवरची कसरत.. आणि परत मारलीय उंच भरारी..
पूर्वीची स्पर्धा, वादविवाद आता मिटत आहेत, लहानपणीच्या त्या गमती अजूनही गालात हास्य आणताहेत,शाळेतील त्या खोडी, त्या गप्पा, मज्जा मस्करी सगळच कसं ताज तवानं करतंय मनाला,हास्याचे ते लोट आता पुढील भेटीपर्यत प्रेमाचा बुस्टर डोसच आहे आमच्यासाठी..
खरोखरच आता मिळतोय जीवनाला वेगळा दृष्टिकोन, वेगळा अर्थ..
जरी असली तीच reunion तीच पूर्वीची दोस्ती आणि तेच शालेय मित्र...

Marathi Thought by janhavi rege : 111899431
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now