बाप कळलाच नाही...
ना कुठली अपेक्षा ना कसली आस
कष्ट करून जीवन जगत राहणे हाच एक ध्यास...
कसला रुसवा ,कसला मान अपमान मनी धरला नाही
माझा बाप मला कधी कळलाच नाही...
जनावर सारखं राबत स्वच्छ करी काळया आईची मान....
कधीच नाही ठेवला माझ्या खांद्यावर हात....
तरी लाखो कराचे बळ देत गेलास...
ना केली तमा कधी अंधाराची,
ना घाबरला कधी वीज पावसाच्या हुलकणी ला...
रागवत असूनही ना राग धरलास उरी कधी...
माझा बाप मला कधी कळलाच नाही....
ना धरली अपेक्षा पैशाची, ना कपड्यांची...
दिले ते आनंदाने स्वीकार केलास तू...
कधी रागवला नाही, कधी हसलास नाही, प्रेमाने कधी मायेचा हात पाठीवरून फिरवला देखील नाही...
माझा बाप मला कळलाच नाही...
मुलगा आहे पुण्याला, मुलगी गावची पुढारी म्हणून कधी मोठेपणा मिरवला नाही....
फाटलेल्या कपड्यांची कधी लाज ही वाटली नाही...
आहे त्यात कष्टाने दिवस काढत झिजत राहिला
माझा बाप मला कधी कळलाच नाही...
पुण्य तुझ्या भाबड्यापणाच म्हणून आज पुन्हा तुला पाहू शकलो...
हातात हात घेऊन आज तुझा....
स्वर्ग सुख आज पुन्हा अनुभवू शकलो....
I Love You अण्णा ...
लेखक
कृष्णा गोरक्षनाथ गवारे
9371455400