ओंजळभर का होईना...
सुखाचे दान माझ्या पदरात मिळु दे
तुझ्या सोबतीचे अनमोल क्षण मला गवसु दे
ओंजळभर का होईना
प्रेमाचे दान माझ्या पदरात मिळु दे
तुझ्या नावाचे कुंकू माझ्या माथी सजु दे
ओंजळभर का होईना
भक्तीचे दान माझ्या पदरात मिळु दे
तुझी माझी साथ कायम राहो, आशीर्वाद राहु दे
ओंजळभर का होईना
सोबतीचे दान माझ्या पदरात मिळु दे
दोघांचं नातं अजुनच मजबुतीने उभं राहु दे
ओंजळभर का होईना
सुख दुःखाचे क्षण अनुभवू दे
त्यात आयुष्याचा गोडवा कायम राहू दे