सामाजिक माध्यमं (social media)धोकादायक ठरत आहेत का...
काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट, आत्महत्या करण्यापूर्वी आपलं शेवटचं बोलणं, आपली इच्छा,आपल्याला झालेला त्रास बोलून दाखवत आपलं जीवन संपवलं. पण ती गोष्ट जेव्हा सामाजिक माध्यमांवर फिरू लागते, तेवढा बघणाऱ्यांच्या मनावरही परिणाम करून जाते.
आपल्या आयुष्यात काहीतरी मनाविरुद्ध घडलं, किवाकुनी वाईट घडून आणलं की प्रत्येकाच्याच मनात आत्महत्येचे विचार येतात.
हल्ली सामाजिक माध्यमांवर वयाचं बंधन नाही. त्यामुळे कुठल्याही वयोगटातला व्यक्ती कुठलीही गोष्ट पाहू शकतो. आणि त्यातल्या त्यात घरच्यांकडून मिळणारी मोकळीक. मग कुठलं आलं बंधन. एवढ्यात tiktok reel वापणाऱ्या तरुण मंडळींमध्ये आत्महत्या करून आयुष्य संपवण्यात खुळ माजलंय. मुळात आभासी आयुष्यात सर्वकाही मानून बसलेली ही पिढी खऱ्या आयुष्याला खोटं समजून बसलीये. त्यात आज वाचलेल्या बातमीने मन हेलावून गेलं. 14 वर्षाची ती मुलगी आत्महत्या करते आणि तिच्या आईच्या सांगण्यानुसार गेल्या तीन चार दिवसांपासून ती आत्महत्येशी संबंधित videos पाहत होती.
आत्महत्येपूर्वी video clip वगैरे सार्वजनिक करण्याची ही पहिली वेळ नाही. पण त्यामुळे आधीच मनधैर्य खचलेल्या तरुण पिढीच्या आत्महत्या करण्याच्या विचारांना बळकटी येतीये, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
मला भावनांची कदर नाही असं नाही, पण आपण केलेल्या गोष्टींमुळे कुणी आणखी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असेल तर गोष्ट वाईटच ना.
सामाजिक माध्यमे हळू हळू आयुष्यात घुसून पार प्रत्येक गोष्ट Control करायला लागली तर कठीण होईलच ना. त्यात मग Blue Whale पेक्षाही ही सामाजिक माध्यमं घातक ठरू नये म्हणजे झालं.