Marathi Quote in Poem by Krushnprakash wankhade

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

तरीही सांभाळलय स्वतःला....

आज काम नाही हाताला 

आणि अशांती आहे मनाला 

मनाच्या चक्रात गुंतवून

विचारांचा ओघ लागलाय वाढायला

तरीही सांभाळलय स्वतःला....


शांतीच्या युगात अशांतिचा वास 

नाही मदतीचा हात

आणि महामारीण केला घात

तरीही सांभाळलय स्वतःला....


दाणा नाही पाणी नाही

नाही भाव पिकाला

मागल्या वर्षाच्या कर्जाला

रात्रंदिवस जागतोय व्याजाला

तरीही सांभाळलय स्वतःला....


आज मुलीला घेऊन दिली गाडी

आणि मुलांसाठी बांधून ठेवली माडी

मुलीच लग्न आणि मुलाचं शिक्षण

भार वाटतोय खिशाला

तरीही सांभाळलय स्वतःला....


गुहार घालून सरकारला

फरक नाही जीवनाला 

कसं होईल भविष्याला

हाच विचार आहे सामान्य माणसाला


सर्व काही ठीक होईल एक वेळेला

कारण काळजी त्या देवाला

हाच विचार करून झोपतो रातीला

पण सकाळी वूठून परत लागतो कामाला



सर्व काही ठीक होईल एक वेळेला

कारण काळजी त्या देवाला

हाच विचार करून झोपतो रातीला

पण सकाळी वूठून परत लागतो कामाला

Marathi Poem by Krushnprakash wankhade : 111668084
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now