स्वप्न हे स्वप्ना परी कालचे वाटे मला
रोजचे हुंकार ते का स्फुरावे आज मला,
मी अमोघ वेडी ती रोज का ठेचकाळते,
रक्तबंबाळ होऊनही पाय पुढे का चालते,
आयुष्याच्या या वाटेवर रोज चालत आहे,
ऊलगडण्या सत्य हे का दिवस हे सरते,
मला समजुन घेण्या मीच ना माझी उरते ,
मी अजुन उरलो आहे का लागते आस ही,
नव्या उमेदीची नवी कहाणी कधी होणार संपुर्ण ती.