Marathi Quote in Poem by Jaaved Kulkarni

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

अरे निष्ठुरांनो मला पण जगु द्या
मुलगी म्हणून अभिमानाने जन्म घेऊ द्या

आई ची सखी, भावाची बहिण आणी
पतीची अर्धान्गिनी होऊ द्या

माझ्याशिवाय तुमचा वंश कसा वाढणार?
भावाच्या हातावर राखी कोण बांधणार?

अन्यायच्या विरुद्ध लढणारी राणी लक्ष्मीबाई मला होऊ द्या
पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करणारी
किरण बेदी मला होऊ द्या

कल्पना चावला सारखी आकाशात उंच भरारी मला घेऊ द्या
लक्ष्मीच्या पावलांनी भरभराट आणून तुमच्या घरात मला नांदू द्या

सरस्वतिच्या रुपाने सर्वाना ज्ञानाची शिकवण शिकऊ द्या
वेळ पडली तर चन्डिके प्रमाणे असुर विचारांचा नाश करु द्या

कुबट विचारांची जळमटे झटकून
मला ही मोकळा श्वास घेऊ द्या

चला सारे एक होऊया
स्त्री-भ्रुण हत्येला आळा घालुया

मुला प्रमाणे मुलीला ही
मायेने आणी गर्वाने वाढऊया

- जावेद कुलकर्णी

Marathi Poem by Jaaved Kulkarni : 111596038
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now