रागाचे रंग आणि रंगाचे राग
( भाग १ )
डॉ गजानन पाटील
( हे लेखन केवळ मनोरंजनासाठी असलेने यातून कोणाच्या भावना अथवा मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही . हे कृपया माझ्या सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे ही विनंती . )
सौभाग्यवती रागवतात तेव्हा मात्र कमालच होते. त्यांच्या रागाचे पदर सुद्धा अनेक असतात. एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी खूप वेळ धरून बसणार हा राग कधी तात्पुरता असतो ,कधी आळवाच्या पानारच्या थेंबा सारखा क्षणभंगूर असतो ,कधी कधी उगाचच मोठाच्या मोठा असतो , तर कधी एकदम हळुवार असतो ...मग हा राग घालवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या सर्व नवरोजी मंडळींना कराव्या लागतात .त्यासाठी रागाचे प्रकार आम्ही रंगानुसार आपणास देत आहोत. कृपा करून आपल्या सौभाग्यवती या रागाच्या कुठल्या प्रकारात मोडतात याचा आपण अभ्यास करावा.. कदाचित याहीपेक्षा वेगळ्या पद्धतीत बसत असतील तर आमच्याशी संपर्क साधावा म्हणजे त्या निमित्ताने आमचा अभ्यास तरी वाढेल..
प्रकार पहिला : अबोली राग
या रागात सौभाग्यवती एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी अबोला धरतात. म्हणजे असं बघा माहेरी जाण्याचा विचार असताना अचानक तो रद्द करावा लागतो हे जेव्हा त्यांना कळतं त्यावेळी त्या काहीच बोलत नाहीत .त्या फक्त शांत राहतात .हा अबोली राग बराच काळ टिकतो आणि काहीवेळा हा खूप दिवस चालतो .पण आपल्या नवर्याने असं काय केलं हे जेव्हा समजते तेव्हा अबोली राग क्षणार्धात नाहीसा होतो . या रागामध्ये नवरोजी मंडळींनी कोणत्याही प्रकारे सौभाग्यवतीना त्रास होईल अशी गोष्ट करू नये. कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्या काळात मुलांना बोलावून त्यांच्यासमोर सांगावा. उदाहरणार्थ मुलगीला हाक मारून असं म्हणावं, की दिदी मला आज ऑफिसला उशीर होणार आहे त्यामुळे तुम्ही जेवून घ्या .आम्ही परस्पर जेवतो .यामुळे हा निरोप अबोली रंगाला बरोबर जाऊन मिळतो आणि त्यानुसार पुढची कारवाई होते .हे जर मान्य असेल तर अबोली रंग आहे तसाच राहतो. जर मान्य नसेल तर मात्र अबोली रंग बदलतो . मग अबोली रंगाच्या पुढे अनेक छटा व्हायला सुरुवात होतात. त्यातूनच पुढचा रागाचा रंग तयार होते.केतकी राग ...
डॉ . गजानन पाटील