प्रिय सैनिक मित्रा , जीव ओवाळावा तरी , जीव किती हा लहान तुझ्या शौर्यगाथेपुढे , त्याची केवढीशी शान खरेच तुम्ही आपल्या देशाची आण -बाण -शान आहात . तुमच्या हाती बंदूक म्हणून आमचं जीवन शांत तुम्ही सावध जागे म्हणून आमची झोप निवांत आमच्या जगण्यासाठी तुमची रोज मृत्यूशी गाठ आम्ही मुलंबाळांत राहावं म्हणून तुमची घरादाराकडे पाठ स्वतःची घरं अनाथ करून तुम्ही देशाची सेवा करता प्राणपणाने तुम्ही लढता म्हणून आमच्या घरात दिवाळी येते तुमच्या उपकारांची जाणीव कृतज्ञतेने ठेवू . आपल्या घरी एक पणती , आपल्या सैनिकांसाठी लावू ..... सर्व भारतीय जनतेचा तुम्हाला प्रणाम भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी , सैनिक हो तुमच्यासाठी .. तुझी एक बहीण
#सलाम