निर्दयी मानवा तुझ्या
विकासाच्या वावटळीत
प्रकृतीचा झाला विनाश
प्रचंड मोठी जंगलतोड .
पाण्याचे स्रोत प्रदूषित
जीवनदायी नद्या प्रदूषित
अन्नधान्य फळ - भाज्या
अन् हवेचे झाले प्रदुषण
जर प्रकृती झाली निर्दयी
तर जगण्याचे होतील वांधे
श्वास घ्याया प्राणवायू नाही
खायला प्यायला अन्नपाणी
*जाग मानवा आता तरी जाग*
*संभाळ जीवनदायी प्रकृतीला*
डाॅ. वर्षा सगदेव
#निर्दयी