*बंडखोर*
अनादि काळापासून स्त्रियांवर,
लादले गेले अनेकानेक निर्बंध,
स्त्रियांना जेव्हा केला प्रतिकार,
कधी तिला ठरवले गेले बंडखोर.
कधी तिच्यावर लादला बहिष्कार ,
आजही उरलेत निर्बंधाचे अवशेष.
आज स्त्री घेते आकाशाचा वेध,
स्त्रीने घेतला सागरतळाचा शोध.
आजही निर्बंधाचे अवशेष रोखतात,
स्त्रीच्या सर्वांगीण विकासाची वाट.
डॉ.वर्षा सगदेव
#बंडखोर