शोभेची ही फुले सारी
काही कागदाची
काही कचकड्याची
नाही गंध ना सुगंध .
सजली प्लास्टिकच्या
सुंदर सुंदर फुलपात्रात
येईनात भ्रमर जवळ
ना फुलपाखरू बागडे .
ना ओवीले गजर्यात
ना माळीला सुंदरीच्या
काळ्याभोर केसाच्या
लांब सडक वेणीत
ना झाला पुष्पहार
नाही चढले देवा चरणी
काय अर्थ देखणेपणाला
नाही सजीवतेचा अंश
डाॅ.वर्षा