कोरोनाची ही लढाई..
वूहान मधून आली आहे महामारीच
पायी जाणारे हतबल मजूर सारीच
ठप्प आहे वाहने जागीच
लालपरी विनावाहक उभीच
अवकाशात गरुडाची झेप नाहीच
बसलीये अडकून फॉरेनला जाणारीच
लवकरचं पळती झाडे पाहूया
सारे मिळून घराकडे पायीच निघूया
सोशलडिस्टनसिंग सगळ्यांचे पाहुनी
शाळेतील एकहाताच्या अंतराची आठवण येऊनी
कोरोना हटावची प्रतिज्ञा सगळे घेऊया
चार लॉकडउन कमीतकमी तरी पाळूया
हिंदी - चीनी भाई भाईचा आहे जुना नारा
टेस्टिंग कीट आणि मास्कचा काळा बाजार सारा
चीन विलग्नवासात जाऊन बसलंय
महामारीच सावट त्यालाही दिसलंय
सॅनिटायझरने हाताची रेषही पुसून जाईल
मास्क लावूनी बुक्यांचा मार दिला जाईल
पाण्याची टंचाई या उन्हाळ्यात जाणवतच नाहीये
तरी दारूबंदी मुळे तहान आमची भागातच नाहीये
अलोपॅथीचा शोध मुळापर्यंत पोहोचला नाही
बस्तीचा काढयामधून सुद्धा कोरोना पडत नाही
साबुदाण्याच्या गोळ्या खाऊन संपत नाहीये
लॉकडाऊन संपत आले तरी लस मिळत नाहीये
कोरोनाची नियमावली महाचर्चेच रूप घेतंय
आरोप प्रत्यारोप पक्ष एकमेकांवर करतंय
भारताचा आकडा लाखा पलीकडे जातोय
आजही पॅकेजसाठी आम्ही राजकारण करतोय
श्रीमंतांचे खवय्येगिरी स्टेटस मध्ये दिसतीये
गरिबी मात्र रस्त्यावर उपाशी मरताना दिसतीये
भुखेसाठी लेकरांना ऊन्हात चालवाव लागतंय
काम नसल्याने आपल्या राज्यात जावं लागतंय
कोरोनाची आहे ही मोठी लढाई
डॉक्टरांनी दाखवली धिटाई
प्रयत्न आहे जवान आणि पोलिसांचा
लोकांना कोरोनापासून बचावाचा
अखंड भारता समोर चीन नाही त्या लायकीचा
महामारीत डाव आहे लडाख मध्ये घुसखोरीचा
कोरोनाची ही लढाई.......
ऋषिकेश श्रीकांत जोशी
28/05/2020