अर्थहीन जीवन भासे
घन तिमीर मनास ग्रासे
न प्रकाशाची किरण दिसे
मानव अंधारात धडपडत
दूर त्या तिथे पलीकडे
पणतीचा प्रकाश दिसे
तो मिणमिणता प्रकाश
ह्रदयात दडलेली आशा.
नको होऊ निराश मानवा
नको सोडू मनाची आशा
ह्रदयी प्रज्वलित ही ज्योत
सर्वत्र पसरवेल दिव्य प्रकाश
डाॅ.वर्षा सगदेव
#पाहण्यासाठी क्लिक करा