मराठवाड्यातील उन्हाळ्याच्या सुट्ट्या अन त्यातीतील typical लग्न म्हणजे attend करण भागच.त्यातल्यात्यात आईच्या आणि वडिलांच्या नात्यातल लग्न एकाच दिवशी. विरुद्ध दिशेची गाव.म्हणजे आईला घेऊन मला जावच लागणार होत.माहेरच लग्न म्हणून आई अगदी सूर्योदयापूर्वीपासून तयारीत होती.शेकडो माहेरचे call संपवून ८ च्या सुमारास निघालो.रात्रीच्या मित्रांसोबाच्या long drive मुले पेट्रोलचा काटा मरणकळा आल्यागत पडला होता.वाटेत पेट्रोल पंप पाहून गाडी बाजूला घेतली.आईला बाहेर थांबवून रांगेत लागलो.अचानक एक तिशीतला मुलगा बहुतेक कामगार असावा माझ्या गाडी आधी स्वतःची splender घुसवली.मी काहीच न बोलता स्मितहास्य देऊन गाडी मागे घेतली.पानिपतच युद्ध जिंकल्यासारख त्याचे काहीतरी विचित्र हावभाव होते अन दादागिरी वाला look.सुट्टे नसल्याने मला पेट्रोल भरावयास जरासा उशीर झाला तोपर्यंत तो तिथेच बाजूला उभा होता.त्याच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नव्हत.त्याचा मागे बसलेला शाळकरी मुलगा माझ्याकडे येऊन बोलला”sorry दादा जरा घाई होती.”मी परत स्मितहास्य देऊन निघालो.गांधीगिरी चे अस्तित्व आणि महत्व दोघालाही कळून चुकले होते.