Marathi Quote in Poem by Vinanti G Kharpatil

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#काव्योत्सव 2.0

कैवारी
शेती प्रधान देश आपला
पण कुठला नेता कधी शेतात राबला
राजकारणात शेतक-यांचा विषय पहिला
सत्तेच्या नावाखाली काय हा बाजार मांडला ?
कर्जाच्या ओझ्याने रोज एक
शेतकरी झाडावर टांगला
न जाणो कित्येकांचा संसार असा रस्त्यावर सांडला
शहरातल्या माॅल- कंपन्यांना दिव्यांची रोषणाई
अन् शेतक-यांच्या डोई मात्र लोडशेडिंगची भरपाई
कधीतरी बघा एकदा राबून शेतात
तुडवित चिखल कधी नांगर घ्या हातात
त्याच्यासारं आयुष्य तु जगुन बघ एकदा तरी
तेव्हाच कळेल तुला भाकरीची किंमत खरी
सोसशील जेव्हा उन्हाचे चटके
तेव्हाच जाणशील त्यांचे आयुष्य फाटके
पिकतं तिथे विकत नाही म्हणुन
आटापिटा करत शहरात येतो
त्याचा फायदा कोणी ति-हाईत घेतो
त्याच्या मेहनतीचं मोल
इथं होतं कवडी मोल
शेतक-यांच्या हितासाठी त्यांना मदत जाहीर करतात
पण शेतक-यांच्या नावाखाली आपलेच खिसे भरतात
अरे नेतेच ते नेतच राहणार
पोकळ आश्वासनं मात्र देतच जाणार
म्हणुनच फुंकावे रणशिंग आता ,वाजावी तुतारी
कोण होईल नेता आजचा
कोण होईल या दीनांचा कैवारी ........

विनंती म्हात्रे खारपाटील

Marathi Poem by Vinanti G Kharpatil : 111170495
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now