Matrubharati marathi
#KAVYOTSAV_2
#marathi kavita
१.
तुझ्याबद्दलची कविता
-------------------------
आभासी जगात या
आपले होऊन जावे
मनापासून आवडावे
असे कधी का व्हावे ?
असे कुणी भेटेल कधी
भास तर सोडा आभास
ही होत नसतो या जगात
खोटयाचा इथे खरा भास
जीवन गमतीदार मोठे
जे घडणार नाही वाटते
नेमके त्या उलट घडते
ही कविता त्याचीच तर आहे
तूच आहेस या कवितेचे कारण
स्वतः ला कमी लेखने सवय तुझी
कमी केली माझ्या शब्दांनी
स्व:ची जाणीव तुला झाली
मग हळू हळू ओळखले तू
किती वेगळेपण आहे तुझ्यात
जाणवले,मी सांगितले तेव्हा
जुनाट नजरेचे चष्मे बदलून
नवे चष्मे घातले की आमूलाग्र
बदल झालेली व्यक्ती आपली
हे पण लक्षात येत नाही..
आत्मनिर्भर व्यक्ती सुंदर दिसते
यात खोटे वाटावे असे काही नाही
--------------------------------- --------
तुझ्याबद्दलची कविता
-अरुण वि.देशपांडे- पुणे
9850177342
-------------- -----------------------------