#काव्योत्सव 2
मन निरभ्र आभाळ,
लेवूनी भावनांचे पंख,
उडती स्वच्छंद,
पाखरासम….
उगवता रवी तो,
किरणे लाल त्याची,
पसरली आसमंतात,
मनातल्या आशासम……
ढग दाटल्यागत,
डोळे भरून आले,
कोसळला मग मल्हार,
आसवांचा….
बरसून गेल्या श्रावणसरी,
सूर्य डोकावतो दारातून,
उधळतो हळूच सप्तरंग,
सुखाच्या इंद्रधनूचे….
रात्री काजव्यांची किरकिर,
चंद्र पौर्णिमेचा हसरा,
तारकांची ही साद त्यास,
गोपिकापरी…..
असं आभाळागत मन,
त्यात अनेक स्वप्न,
मनिषा अन् प्रेम,
हे घर भावनांचे……